Showing posts with label Marathi jokes. Show all posts
Showing posts with label Marathi jokes. Show all posts

Sunday, September 19, 2010

Marathi Funny Jokes

म्युझियममध्ये काही पर्यटक फिरत असतात
पर्यटक : हा सांगाडा कोणाचा आहे?  
गंपू : हा इथल्या राजाचा आहे. 
पर्यटक : आणि हा लहान सांगाडा? 
गंपू : तो राजा लहान असतानाचा आहे   

************************************

परीक्षेनंतर गंपू आणि झंपू भांडत असतात
पिंकी : तुम्ही दोघं का भांडताय? 
गंपू : या मूर्ख झंपूने पेपर कोरा दिलाय! 
पिंकी : मग? 
गंपू : मी पण कोरा दिलाय... बाईंना वाटेल मी याची कॉपी केलीय.      

********************************************

 गंपू : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस ?
झंपू : अरे बहिणीशी रे... 
गंपू : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची काय गरज? 
झंपू : बहीण तुझी आहे.. 

**************************************

रात्री झोपताना इंग्लिश मॉम म्हणते- हिंदी माँ म्हणते- शुभ रात्री
आणि मराठी आई म्हणते- चुलीत घाल तो मोबाइल आणि झोप आता.  

**************************************************
एक माणूस मेल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या बायकोला भेटायला त्याचा एक मित्र जातो.

मित्र : जर तुमची काही हरकत नसेल तर मी माझ्या मित्राची जागा घेऊ शकतो का?

बायको : माझी काहीच हरकत नाही. फक्त कब्रस्तानवाल्यांना विचारुन घ्या.

******************************************************

एकदा बंडूला २० लाख रुपयांची लॉटरी लागते. तो आपलं लॉटरीचं तिकिट घेऊन लॉटरी सेण्टरमध्ये जातो. तिकिटाचा नंबर तपासल्यावर सेण्टरचा मालक त्याला म्हणतो, 'नंबर बरोबर आहे. आम्ही तुम्हाला आता १ लाख रुपये देतो. उरलेले १९ लाख रुपये तुम्ही पुढल्या आठवड्यात घेऊन जा.

बंडू : (चिडून) नाही, मला सगळे पैसे आत्ताच हवेत. नाहीतर मला नको तुमचं तिकिट, तुम्ही मला तिकिटाचे ५ रुपये परत द्या बरं. 
  *********************************************************

शांताबाई : अहो, धनी.. डाक्टर काय म्हनाले ऐकलं काय तुमी. माझं बीपी वाढलंय म्हने. हे बीपी म्हंजी काय ओ?

तात्याराव : फार टेन्शन घ्यायचं काम नाही गं. बीपी म्हंजे बावळटपना!! 

***************************************************

प्रियकर : प्रिये.. माझ्या डोळ्यांत बघ.. तुला काय दिसतं? पटकन सांग..

प्रेयसी : प्रिया, मला तुझ्या डोळ्यांत दिसतं खरं प्रेम.

प्रियकर : गधडे, डोंबल तुझं. डोळ्यांत कचरा गेलाय बहुतेक. फुंकर मार पटकन. 

*********************************************************

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!
 
 


Related Posts Plugin for WordPress, Blogger...